Wednesday 23 December 2015

              To write or not to write, that is the question...लिहावं की न लिहावं हा एकच सवाल...या दुनियेच्या प्रश्नांवर, रोजच्या कट्कटींवर, लिहावं बेसुमार, बेफाम, बेलगामपणे...की फेकून द्यावा काहीतरी कळत असल्याचा अहंकार, समजत असल्याचा आव आणि झोपून जावं गपगुमान स्वतःच्या पांघरुणात डोकं घालून...
              To write or not to write, that is the question...लिहावं की न लिहावं हा एकच सवाल...
              काय? किती? कशावर? हे सगळे नंतरचे प्रश्न...मूळ प्रश्न तर हा...का? कारण आहेत तर सगळ्या रोजच्याच गोष्टी...सगळ्यांच्या सारख्या...थोड्या कमी-जास्त...मग त्यावर लिहिण्यासारखं काय? आणि जर खरंच जर काही असेल, तर मग सगळ्यांनी लिहूनही मी लिहिण्यासाठी वेगळं उरलंय काय?
              रोजची तीच पहाट... Alarm snooze करत-करत रोजचं झोपेशी युद्ध...train पकडण्यासाठी रोज सकाळची तीच गडबड...तेच तिकीट, तेवढेच पैसे, तोच प्लॅटफॉर्म, बऱ्याचदा तीच train... चढण्यासाठीचा तोच specific डबा... माणसं पण तीच...
              पोहोचण्यासाठी लागणारा तेवढाच वेळ...उतरतानाची तीच धक्का-बुक्की...college च्या gate वर उभा असलेला तोच watchman. पायऱ्या चढताना pass होणारी तीच एखादी मुलगी. रोजची तीच रटाळवाणी lectures... कधी बाकाखाली पुस्तक वाचत रेटलेली, नाहीतर कधी बिनधास्त बाकावर डोकं टेकवून...
               तेच खाणं-पिणं... घरी निघतानाची तीच ती मरगळ. पुन्हा तीच गर्दी, शिक्षा केल्यासारखं वरच्या हँडलला लोंबकळणं...रोजची तीच अचानक बसायला मिळालेली जागा...रोजचं तेच खुश होणं...
                आता या रोजच्याच गोष्टींवर काय लिहायचं काय बोलायचं?
                 लिहिण्यासाठी काहीतरी वेगळं हवं, नाही का? हे तर तेच, रोजचंच... ह्याला काही नाव नाही, ह्याला काही भाव नाही...पण काय माहित का? या रोजच्याच गोष्टींमधून होणारी रोजची realizations...
                 कधीतरी भयानक कंटाळा आलेला असतो. Earphones लावून आपण पहिलं गाणं play करतो. थोड्या वेळात त्याचाही कंटाळा येतो. Next. कंटाळा. Next. कंटाळा. Next. पुन्हा तेच. Next. पुन्हा तेच तेच...एकूण ३७२ गाण्यांपैकी एकाही गाण्याने आपल्याला साथ देऊ नये?...मग सरळ shuffle ला टाकायचं आणि phone बाजूला ठेवून द्यायचा. असाच रोजचा दिवसही shuffle mode वर टाकून द्यायचा. No plans. जे होतंय ते enjoy करत रहायचं...पण shuffle वरची गाणीही bore झाली तर? मग earphones काढून शांतपणे झोपून जायचा option आहेच. उद्या तीच गाणी ऐकली, तर आवडणार नाहीत कशावरून?
                  लोकलमध्ये खच्चून गर्दी. आपण fourth seat च्या बाजूला लोंबकळतोय. मनात एकंच विचार. जर हे fourth seat मिळालं तर निदान बुड टेकायला तरी जागा मिळेल. Fourth seat वाला बिचारा आखडून बसलाय. त्याच्या मनात एकच विचार...हा शेजारचा third seat वाला उठला तर निदान थोडं नीट बसता येईल. Third seat वाला या विचारात कि second seat वर जरा relaxed बसता येईल. Second seat वाल्याला window हवीये. आणि window seat वाला? तो तर साला अर्धवट झोपेत, देव जाणे कुठल्या विचारात...Train मधला प्रत्येक जण कुठल्यातरी दुसऱ्याच्याच position च्या मागे आहे. आणि train चाललीये.. माणसं चढतायत, उतरतायत. काहींना ती position मिळतीये, काहींना नाही...मग वाटतं की हे असाच असेल तर मग why not be where we are? Why not enjoy where we stand? नशिबात असेल तर window seat पर्यंत पोहोचूच...नाहीतर third seat पण काही वाईट नाही...आणि आत्ता?...आत्ता त्या समोरच्या चेम्बलेल्या माणसापेक्षातरी बरे उभे आहोत!
                    सायन स्टेशनबाहेर रोज सकाळी इडली-वडा विकणाऱ्या माणसाला काय नाव द्यावं? "वडा देना!", बस्स, एवढाच काय तो आमच्यातला रोजचा संवाद...मोकळ्या झालेल्या जागेत बसण्याचा पूर्ण हक्क असूनही, मला बसायची खूण करणाऱ्या माणसाशी माझं काय नातं? त्याला काय नाव द्यावं?...रोज काहीतरी वेगळं घडवण्याच्या नादात, रोज तेच-तेच घडत राहतं आणि त्या त्याच-त्याचपणामधून काहीतरी 'वेगळंच' मिळतं...त्याच-त्याचपणाच्या beats... त्या beats चा एक pattern... आणि त्या pattern मधून निर्माण होणारा एक आपसूक rhythm...the rhythm of life...There is repetition and also variation...But still, it is stable...the rhythm of life...once you start to feel it, can't stop to enjoy it!
                   मग लक्षात येतं कि आयुष्यात सारखं-वेगळं, चांगलं-वाईट असं काहीच नसतं. तुम्हाला फक्त तुमची स्वतःची लय सापडवायची आहे...Your own rhythm...with your rules...your variations, your repetitions...then, you are at peace. And sometimes, your rhythm starts matching with someone else's, making it beautiful like it wasn't before...then you call it 'love'...
                   अशा काही गोष्टी...नावात न बसणाऱ्या, शब्दात न अडकणाऱ्या...कधी नाव नसलेले विचार, नाव नसलेले अनुभव...नाव नसलेल्या ओळखी, नाव नसलेली नाती...कॉलेजमधल्या त्या नाव (माहित) नसलेल्या मुली...(हा हा हा!)...काही नाव नसलेली secrets... काही नाव नसलेल्या आठवणी...
                    अशा काही नाव नसलेल्या गोष्टी share करण्यासाठी हा 'नाव नसलेला ब्लॉग'!
                    ब्लॉग सुरु करावा की नाही, या विचारात होतो, तेंव्हा बरेच जण म्हणाले की - "हरकत काही नाही, पण consistently लिहिला गेला पाहिजे, २ पोस्ट लिहून बंद पडला असं व्हायला नको!"...खरंय, अगदी खरंय...कदाचित हा ब्लॉग बंद पडेलही... कदाचित उद्याच, किंवा २ दिवसांनी, कदाचित आठवड्यानी किंवा महिन्यांनी, किंवा कदाचित...असो! पण वाटलं, सुरु करण्याच्या आधीच बंद पडण्याचा विचार कशाला करायचा?...सुरु तर झाला...
                    आणि समजा...पडला बंद...तर?
                    कोणीतरी कुठेतरी कोणालातरी म्हणेल - "अरे, तो नाव नसलेला ब्लॉग बंद पडला!"
                     मग तो 'कोणालातरी' 'कोणीतरीला' म्हणेल...
                  - "कुठला?"...

                      
                  

11 comments:

  1. uttam..ekhada wishay gheun lihilas tar aankhin sundar lihishil as mala watatay..

    ReplyDelete
  2. नाव नसलेला ब्लॉग वाचुन, नाव नसलेल्या भावना आल्यात मनात...

    एकंदरीतच Facebook → Blog हे Transition जमलंय म्हणायचं.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. पायऱ्या चढताना pass होणारी तीच एखादी मुलगी.
    ...... Your own rhythm...with your rules...your variations, your repetitions...then, you are at peace. And sometimes, your rhythm starts matching with someone else's, making it beautiful like it wasn't before...then you call it 'LOVE'...
    Hyatun tula nakki kay Sandesh dyaychay? :-P...
    Jokes apart... Chan lihilayes

    ReplyDelete
    Replies
    1. यातून मला काय संदेश द्यायचाय?...तोच जो तू घेतलायस मित्रा!!...😊😊..धन्यवाद!!

      Delete
  5. ऋत्विक, एक खूप चांगला प्रयत्न...लिहिता लिहिता तू ऱ्हिदम पर्यंत पोहोचलास! ज्याला ज्या विषयातला ऱ्हिदम सापडतो तो त्या विषयात खूप पुढे जातो आणि त्याचा आनंदही घेतो. ताल फार महत्वाचा आहे...तुझे लिखाण अजून खूप वाचायला आवडेल...पुढे जात रहा....!!-अभय काका

    ReplyDelete
  6. खूपच उत्तम लिहिलेय
    ते ट्रेनच्या सीट चे उदाहरण दिलेय ते उत्तम जमलय. मला असे वाटले कि जणू ती window सीट म्हणजे कंपनी मधील manager ची पोस्ट आहे .
    सगळ्यांचीच त्यासाठी धडपड चालू आहे . सगळ्यांनाच ती मिळेल असे नाहीये .
    पण जो धडपड करणार नाही त्याला मिळण्याची शक्यता कमीच .

    तू एक उत्तम लेखक असूनही १ वर्षात १ च पोस्ट लिहिलीस . त्यावरून तुलाही काहीतरी प्रेरणा देणाऱ्या गोष्टीची गरज आहे हे स्पष्ट होते. मी अशाच प्रेरणेच्या शोधात ह्या blog पर्यंत आलो .
    "तर मग सगळ्यांनी लिहूनही मी लिहिण्यासाठी वेगळं उरलंय काय?" …… रोज आपण वर्तमानपत्र उघडतो त्यात रोज वाचण्यासाठी नवीन असते .
    जग खूप मोठे आहे आणि जगातल्या सगळ्याच गोष्टी पाहण्यासाठी हा जन्म पुरेसा नाही .
    लिहिण्यासाठी खूप सारे विषय आहेत . गरज आहे ती प्रेरणेचि .

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! अनोळखी कोणाकडून तरी प्रतिसाद मिळण्याची ही पहिलीच वेळ.

      प्रेरणेची गरज आहे हे नाकारता येत नाही. परंतु लिहिण्यासाठी काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करणे हे सगळ्यात महत्वाचे! माणूस 'लेखक' म्हणून लिहायला लागला की मग तो त्या पदवीतच अडकत जातो. मग लेखणीची चाल ही ठराविक व्हायला लागते.

      स्वतःच्याच लेखणीच्या शाईमधे स्वतःच बुडून जाऊ नये म्हणून केवळ हा खटाटोप!

      बाकी तुझ्यासारख्या उत्स्फूर्त वाचकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे लिहिण्याची प्रेरणा मिळते हेही तेवढंच खरं!!!

      Delete