Post लिहायची म्हणजे काय करायचं? एक विषय ठरवायचा, त्याच्यावर विचार करायचा. आपल्याला मांडायचे मुद्दे ठरवायचे. महत्वाचा मुद्दा राहू नये म्हणून त्यांचा sequence ठरवायचा. एखादी 'आकर्षक' अशी सुरुवात तयार करायची, एक हळहळणारा end ठरवायचा. एक पेन घ्यायचं, एक कागद घ्यायचा, आणि रेखीव अक्षरात लिहायला सुरुवात करायची...
अरे हट्ट!
Post लिहायची म्हणजे एक पेन घ्यायचं, एक कागद घ्यायचा आणि खरडायला सुरुवात करायची...खरडायची इच्छा संपेपर्यंत...
आयुष्यात जगायचं तर एक श्वास घ्यायचा, एक सोडायचा आणि जगायला सुरुवात करायची...जगण्याची इच्छा संपेपर्यंत...
पेन हातात घेतलं की प्रश्न पडायला सुरुवात होते. प्रश्नांना लाथा घालायच्या आणि जे पाहिलं वाक्य येतंय ते उतरवायचं. मग पुढे सुचलं तर सुचलं नाहीतर सगळं तिथेच अर्धवट सोडलं.
पुढची वाक्यं सुचायला अर्धा तास लागत असेल, तर स्वतःला जरा थांबवायचं. थोडं इकडे-तिकडे करून यायचं. दोन ग्लास पाणी प्यायचं आणि उगाचच टॉयलेटला जाऊन बसायचं. फ्लशचं पाणी पूर्ण जाईपर्यंत त्याच्याकडे बघत बसायचं. त्या वाहणाऱ्या पाण्यामुळे आपल्या लिखाणाला inspiration तर मिळत नाही ना?, असा विचार करायचा.
स्वयंपाकघरात जाऊन उगाचच आईला मदत केल्यासारखं करायचं आणि मधल्या-मध्ये डब्यातल्या चिवड्याचा बकाणा भरायचा. आणि दुसऱ्या हातात जमेल तितका चिवडा उचलून पुन्हा आपल्या कागद-पेनापाशी येऊन बसायचं.
दुसऱ्या हातातला चिवडा आख्खा संपेपर्यंतही जर दुसरी ओळ सुचली नाही तर मात्र हात झटकायचे, पेन बंद करायचं, कागद अलगद दूर ठेऊन द्यायचा. स्वतःच स्वतःला कोपच्यात घ्यायचं आणि म्हणायचं - "भाई...छोड दे...तुझसे नहीं होगा!"
सगळं आवरल्यावर एक मिनिट गप्प बसायचं. थोडे इकडचे-तिकडचे विचार झाले की समोरच्या पुस्तकाकडे पाहायचं.
आयुष्यात जगायचं तर फार कशाच्या नादाला नाही लागायचं. जमलं तर जमलं नाहीतर...शर्माजींच्या मुलाला जमलं. आणि शर्माजींच्या मुलाकडून पार्टी वासून करायला मात्र आवर्जून जायचं!
फार काही मनावर घ्यायचं नाही, chill रहायचं. समोरचं economics इच्छा नसेल तरी वाचायचं.
काय माहित? या भूतालावरचे सगळे पालक म्हणतात ते खरंही असेल-
"काहीही झालं तरी चांगले marks पडणं महत्वाचं, शेवटी तेच उपयोगी येणारेत!"...😊😊😊
Monday, 22 February 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
समोरचं economics इच्छा नसेल तरी वाचायचं.😂😂. You hate economics so much that you wrote it in your blog.
ReplyDeleteहाहाहा....आणि तुला शिकव म्हणलं तर शिकवलं नाहीस!!
Deleteहाहाहा!! मस्तच.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete