Friday 17 March 2017

08-03-2015

माझ्या प्रिय मैत्रीणीहो, 
(इथे मित्रांना मुद्दामहूनच वगळण्यात आलंय हे माझ्या 'सुज्ञ' मित्रांनी लक्षात घ्यावं तसंच 'प्रिय' हा शब्दही मुद्दामहूनच वापरण्यात आला आहे, हे माझ्या 'शंकेखोर' मित्रांनी लक्षात घ्यावं!) 
तर माझ्या 'प्रिय' 'मैत्रीणीहो', 
            महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! खरंतर मला हे असे days वगैरे साजरे करणं अजिबात पटत नाही आणि जमत तर त्याहूनही नाही (म्हणजे tie -day   etc etc.) माझ्या मते ज्या दिवसापासून आपल्याला 'महिला दिन' साजरा करण्याची गरज पडणार नाही, त्या दिवसापासून रोजच खऱ्या अर्थाने 'महिला दिन' साजरे होतील. पण तरीही मी हे सगळं लिहितो आहे ते माझ्या स्वतःकडून, माझ्या इतर 'सुज्ञ' आणि 'शंकेखोर' मित्रांकडून (म्हणजे मीच!) आणि तुमच्या इतर काही मित्रांकडून (म्हणजे पण मीच!!). 
             खरंतर असं विशेष बोलण्या-लिहिण्यासारखं काही नाही. पण या मूर्ख आणि बिनडोक जगामुळे काही चुकीच्या concepts  तुमच्या डोक्यात बसू शकतात. त्या तशा बसू नयेत, म्हणून ही सगळी खटपट. 
             No .1. तुम्ही कुठल्या type चे कपडे घालता त्यावरून आम्ही तुमचं character ठरवत नाही. आणि जे ठरवत असतील ते लोक अतिशय रद्दड आणि मंद आहेत हे लक्षात ठेवा. मुळात तुम्ही काय कपडे घालावेत किंवा काय घालू नयेत हे ठरवण्याचा हक्क फक्त तुम्हाला आहे. तुमच्याकडून मी काही शिकलो असीन तर ते हेच की सुंदर असणं किंवा सुंदर दिसणं यात काहीच चूक नाही. या 'सुंदर' दिसण्याचा काळेपणा-गोरेपणाशी काही संबंध नाही. (कधी-कधी असू शकतो.) तुम्ही सुंदर दिसता तर दिसता. तुम्ही सुंदर दिसण्यात तुमची काहीही चूक नाही तसंच आम्हाला तसं वाटण्यात आमचीही काही चूक नाही. किंबहुना सुंदर दिसण्याचा प्रयत्न करण्यातही काही चूक नाही. (अर्थात! कधी-कधी असे फसलेले प्रयत्न पाहताना, पाहणाऱ्याला खूप मनस्ताप होतो. तेवढं सांभाळा पोरींनो!) उलट तुमच्यामुळे माझ्यासारख्या लोकांना बरे कपडे घालण्याची, अधून-मधून केस विन्चारण्याची ,कधीतरी नखं कापण्याची इच्छा होत राहते. 
No .2 . Love ,break -up ,relationships वगैरे तत्सम गोष्टींबाबत आम्ही जेवढे 'छपरी' आहोत तेवढ्या तुम्हीपण आहात. आम्हाला जशा एकावेळी अनेक मुली 'भारी' वाटतात, आवडू शकतात त्याचप्रमाणे तुम्हालाही जाता-येता दिसणारा कुठलाही मुलगा 'भारी' वाटू शकतो. आम्ही जसे मुलींवर line मारण्याचा प्रयत्न करतो (व्यर्थ!) तसे प्रयत्न तुम्हीही करता (मुलांवर!) हे आम्हाला मान्य आहे.(पण नेमकं अशा बाबतीत माझ्यासारख्याला वाळीत टाकण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? याचं उत्तर द्या.) 
        तुम्ही अगदी आमच्यासारख्या नाही आहात पण आमच्याहून वेगळ्यापण नाही आहात. तुमच्यामागे गाडीवर बसताना आम्हालाही तेच वाटतं जे तुम्हाला आमच्या मागे बसताना वाटतं .(फक्त भीती थोडी जास्त वाटते. उगाचंच जीवाशी खेळ!) बसताना नेमकं किती अंतर ठेवून बसावं,हात कुठे ठेवावेत याबाबत confusion  तुमच्यासारखं आम्हालाही आहे. रात्री उशिरापर्यंत जागणे,messages ची वाट बघत बसणे आणि उगाचच selfie काढत राहणे अशा 'वाईट' सवयी आम्हाला तुमच्यामुळे लागल्या.(त्यामुळे तुम्ही फार भारी आहात असं वाटून घेऊ नका. कुछ भी करनेका लेकिन ego  नही hurt करनेका!) तुम्हाला जशी 'तुमच्या-तुमच्यात' gossips करायला आवडतात, तशीच आम्हालाही 'आमच्या-आमच्यात' gossips करायला आवडतात. फक्त आमच्या चर्चा तुमच्या एवढ्या secret रहात नाहीत.(आमच्या काही 'गद्दार' मित्रांमुळे! त्यांच्यावर आम्ही लवकरच कठोर action घेणार आहोत.) तुम्ही एखादा 'sex 'वाला joke मारलात, तरी काही फरक पडत नाही. त्यांनी तुमची decency वगैरे कमी होत नाही. 
        खरंतर तुम्ही काहीही केलंत तरी आम्हाला काही फरक पडत नाही (शेवटी ego  नाम की भी कोई चीज होती है?) तुम्हाला काही-काही गोष्टी share करायच्या नसतात, हे आम्हाला कळतं. कधी-कधी खूप काहीतरी बोलायचं असतं पण जमत नाही हेही कळतं. तुम्ही एखाद्याचा राग करता तो  मनापासून आणि एखाद्याला जीव लावता तेही मनापासून! 
         खरंतर हे सगळं लिहिलंच पाहिजे होतं असं काही नाही. पण प्रत्येक वेळी गोष्टी बोलता येत नाहीत.(नाहीतर एव्हाना 'सगळं' settle  झालं असतं.) पण आजूबाजूला अशा विचित्र घटना घडत असताना, तुम्हाला काही 'वेगळंच' तर नसेल ना वाटत?,असं वाटलं. फक्त एवढंच म्हणायचं होतं की आपण जे काही आहोत,जसे वागतो ते okay वागतो. कदाचित काही चुका होतही असतील. स्त्री-पुरुष समानतेवर बोलण्यात काहीच अर्थ नाही. कारण ते बोलण्याची वेळ येते, तेंव्हा त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. तुम्हालाही चुकण्याचा तेवढाच अधिकार आहे जेवढा आम्हाला आहे आणि त्या सुधारायचाही तेवढाच अधिकार आहे, जेवढा आम्हाला आहे. आपण जे काही आहोत,जसे काही आहोत,जसे वागणार आहोत, ते आपण ठरवूया,आपण explore करूया आणि या 'मूर्ख' आणि 'बिनडोक' जगाला बाजूला ठेवूया. 
          बाकी एवढं formal होऊन "महिला दिनाच्या शुभेच्छा!" वगैरे दिल्या तर तुम्हीही मला formality  म्हणून party वगैरे द्या? आणि माझ्यासारख्या गरिबाला अधून-मधून तरी तुमच्या 'timepass' मध्ये घेत रहा. तेवढंच जरा श्रीमंत झाल्यासारखं वाटतं आणि आयुष्य मजेत जात राहतं. आणखी काय? 

                                                                                                                                                     
                                                                                                                                                           तुमचा 'असाच एक' मित्र 
                                                                                                                                                           (कसा ते तुम्ही ठरवा!) 

No comments:

Post a Comment