27-11-2012
नमस्कार, आज खूप दिवसांनी facebook वर स्वतःहून उत्साहाने पोस्ट करतोय, त्यासाठी कारणही तसंच आहे.
आता मी शाळेतून बाहेर पडून जवळपास ६ महिने वगैरे झाले आहेत, त्यामुळे आम्हा मित्रांमध्ये nostalgic होण्याचं वारं, अधून-मधून वाहतच असतं. मग शाळेतले तास,वर्ग,मित्र,शिक्षक यांना आम्ही miss करतो.पण हल्ली, आम्ही शाळेबद्दल काय miss करतो यापेक्षा शाळेनी आम्हाला काय मिस करू दिलं नाही, याचेही विचार मनात डोकावत असतात.
शाळेत असताना एक गोष्ट नेहमी सांगितली जात असे-"तुम्ही selected ४० हुशार मुलं आहात,तुमच्यात अफाट बुद्धिमत्ता आणि creativity आहे, त्यामुळे तुमचा इथे, वेगळ्या प्रकारे व्यक्तिमत्व विकास केला जातो". मग मला नेहमी एक प्रश्न पडायचा-"वेगळ्या प्रकारे म्हणजे?". शाळेत उत्तर मिळाली, कॉलेजला आल्यावर पटली.
गेल्या सहा वर्षात शाळेतून, दलावर जाऊन, उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपण कसे घडलो rather अजूनही कसे घडतोय, असे प्रश्न पडतात.मग "काय मिळालं?काय गेलं?" असं गणित मांडून बसतो. पण मुळातच माझं गणित कच्च असल्यामुळे, बेरीज मोठ्ठीच्या मोठ्ठी होत जाते आणि वजाबाकी आपसूकच बाजूला पडते.
आजच्या (ता.२७ Nov २०१२) 'Today' च्या पुरवणीतील, मुक्तपिठ्चे सदर जरूर वाचा. ज्ञान प्रबोधिनीच्या थोड्याशा उल्लेखातूनही आपल्याला इथे काय आणि कसे वेगळे घडवले जाते ते कळून येईल. मग हलकेच छाती अभिमानाने फुगेल, चेहऱ्यावर किंचित हसू उमटेल आणि आपल्या प्रबोधिनीपणाची नोंद आजूबाजूचे लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे घेत असतात याची पावती मिळेल.
त्यामुळे मला घडविणारे माझे आई-बाबा, मित्र, शाळेतील शिक्षक आणि आमच्या दलावारचे दादा यांना मनापासून धन्यवाद!
-(बाकी काही असलो किंवा नसलो तरी) एक प्रबोधक

No comments:
Post a Comment