Friday 17 March 2017

22-08-2014  

 कोण म्हणतं  माणूस 'mature' होतो? आपला त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो फारतर. कदाचित  ह्यालाच ते mature होणं म्हणत असतील. कोण म्हणतं माणूस 'निडर' बनतो? प्रत्येक वेळी त्याला संकटात अडकण्याची आणि त्यातून सुटण्यासाठीची जीवघेणी धडपड करण्याची cycle  पूर्ण करायलाच लागते. ज्याला आपण संकटात सापडणार आहोत याची जाणीव असूनही जो त्यात उडी घेतो त्यालाच 'धाडसी' म्हणावं … 
           माणसं  ओळखण्याची माझ्यासारखी धडपड तुम्हीही केली असेल… या गोष्टीचा वयाशी काही संबंध नाही. कारण अशा बाबतीत आपण कितीही मोठे झालो तरी असतो लहानच. किंबहुना ज्याक्षणी आपल्याला आपण मोठे झालोय असं वाटतं त्याक्षणी आपण खूप लहान झालेलो असतो . 
           आपल्या आयुष्याचं पुस्तक बनवावं असं प्रत्येकाचं छुपं स्वप्न असतं .पण मग ते लिहायचं धाडस आपण का करत नाही? आपल्या आयुष्याचं पुस्तक लिहिलं गेलं तर त्यात काय लिहिलं जाईल, असा विचार केलाय कधी? मला बऱ्याचदा भीती वाटते की माझ्या आयुष्याबद्दल माझ्याकडे लिहिण्यासारखं बरंच काही असलं ,तरी ते वाचणाऱ्याला त्यात वाचण्यासाठी खरंच काही इंटरेस्टिंग सापडेल का? 
           "जन्म झाला-बालपण सुखात गेलं-शिक्षणाला सुरुवात-१०वीत ९५%,१२वीत ८५%-सुप्रसिद्ध कॉलेज मध्ये admission -कट्ट्यावर बसून केलेली मस्ती-शिक्षण पूर्ण-चांगल्या पगाराची नोकरी-चांगल्या प्रकाराची छोकरी-घर,गाडी,मुलं -पुन्हा त्यांचं आयुष्य-म्हातारपण-मरण"…आपल्या सगळ्यांचं आयुष्य एवढ्याश्या जागेतच मावत असेल तर त्याला फुलवून फुलवून असं कितीसं मोठं पुस्तक होणार? लिहितोय त्यालाही  माहिती आणि वाचतोय त्यालाही माहिती की याचा सारांश ४ ओळीत मांडता येईल … 
           मला माहितीये हे सगळं फार vague आणि असंबद्ध होतंय. पण जर समजायचं असेल तर समजेल. तसंही आपल्या आजूबाजूला असंबद्ध गोष्टीच चालतात आणि आपण त्या blindly  follow करतो. १०वी -१२वीत नापास होण्याचा आणि आयुष्यात आनंदी होण्याचा काय संबंध? शर्टचं वरचं बटण उघडं ठेवण्याचा किंवा डोक्यावर केसांची style करण्याचा एखाद्याच्या character शी काय संबंध? तो आपण लावतोच ना? किंवा मी लिहिण्याचा आणि वाचणाऱ्यांना ते आवडण्याचा काय संबंध?.तो मी लावतोच आहे ना? ज्याला हे वर लिहिलेलं अजिबातच आवडलेलं नसेल,त्याला ते आवडावं म्हणून मी केलेली ही व्यर्थ सारवा-सारव … 
         समोर कोरा कागद असला की अस्वस्थपणा येतोच. तो थांबवता येत नाही. मनामध्ये लिहावं वाटणारं असं खूप काही असतं पण पेन कागदाजवळ आलं आणि सगळा विचका होतो. जे बोलायचं असतं,त्याहून वेगळंच लिहिलं जातं, जे लिहिलेलं असतं त्यातून वेगळंच वाचलं जातं, त्यातून पुन्हा वेगळेच अर्थ आणि त्यावरून प्रत्येकाचं स्वतंत्र मत…पण ठीके … प्रत्येक वेळी चांगलंच दिसण्याचा अट्टाहास का? प्रत्येक वेळी व्यवस्थितच असण्याचा अट्टाहास का? कधीतरी इकडे-तिकडे झालं तर? प्रत्येक वेळी 'बरोबरंच' असण्याचा अट्टाहास का?…कधीतरी मुद्दामहून चुकून पण पाहिलं पहिजे…कदचित तेच 'बरोबर' निघेल,काय सांगावं? 

No comments:

Post a Comment