Thursday 16 March 2017

25-12-2012

आज खूप दिवसांनी स्वतःच्याच facebook वरच्या पोस्ट वाचल्या. शाळा संपण्याच्या वेळी लिहिल्या होत्या ना त्या...पुन्हा nostalgic झालो. आपसूकच सगळ्या गोष्टी डोळ्यासमोरून जाऊ लागल्या. 
आता नाही-नाही म्हणत कॉलेज सुरु होऊन ४ महिने झालेच.हळू-हळू सगळे जण so called कॉलेज लाईफला रुळले. खांद्यावरती नवीन sack, मनगटावर नवीन घड्याळ, आणि डोळ्यावरती goggle यायला लागले. एरवी डोक्यावर खाली बसलेले केस आता वर-वर उठायला लागले. नवीन mobile च्या इयरफोननी दोन्ही कानात जागा permanent बुक करून टाकली. 
चालण्यात style आली, बोलण्यात attitude आला. नवीन मित्र मिळाले. आधीचा मोठा group तुटून, छोट्या group मधेच नवीन चेहेरे add झाले. काहीजणांच्या सायकलींची जागा आता गाड्यांनी बळकावली. काहींना त्या गाडीच्या मागे बसायला 'व्यक्ती' सुद्धा मिळाली. एकुणात काय? आता एक वेगळीच मजा सुरु झाली. 
पण ह्यामध्ये "काहीही झालं तरी महिन्यातून दोनदा तरी एकत्र भेटूच!!" च्या घोषणा मागे पडल्या.क्लासेस,submission च्या नादात ही असली emotional नाटकं मागे पडून गेली. 
"mobile वर 'टच' मध्ये राहूच की" असं म्हणणारे आपण किती जणांना स्वतःहून फोने करतो? फक्त आठवण येतीये म्हणून? 
आत तुम्ही म्हणाल-"एवढा वेळ कोणालाय?"...खरंय...इथे कोणालाच वेळ नाहीये. पण कुठेतरी एकटच चालत असताना हमखास हा विचार येतो-"आपण आत्ता शाळेत असतो तर काय करत असतो?" मग आपणही भावनिक होतोच. "वो भी क्या दिन थे" असं म्हणत हळहळतोच. 
अजूनही घरी जाताना माझ्या मनात वेगळाच विचार चमकतो. तोच मी, तीच सायकल, तोच रस्ता पण सोबतीला कोणीच नसतं. तिथेच बाजूला उभी असलेली ओळखीची वडापावची गाडी दिसते. समोरच २-४ खुर्च्या मोकळ्या पडलेल्या असतात. खूप वाटतं-आत्ता जावा आणि चार वडापाव ऑर्डर करावेत आणि मित्रांसोबत गप्पा झोडत फस्त करावेत. संध्याकाळच्या ७ चे ८ कधी वाजले कळूच नये. 
पण मग मी अचानक भानावर येतो. "आदमी एक और खुर्च्या चार?" असा पांचट जोक मारून मी तिथून लगेच सटकतो. 
कारण न जाणे लोक घरी जाऊन काय सांगतील ?--- 
"आज एक येडा रस्त्याच्या मधेच रडत बसला होता..." 

No comments:

Post a Comment