Thursday 16 March 2017

18-11-2013     

                      रात्रीची वेळ असते. नुकतंच जेवण झालेलं असतं. आवडती serial ही पाहून झालेली असते. आपण खुशीत येउन कानात earphones घालतो आणि आपली रोजची 'आवडत्या गाण्यांची' playlist सुरु करतो. त्या गाण्यांच्या ठेक्यावरच आपला अभ्यास सुरु होतो. इतक्यात mobile vibrate होतो. आपलं लक्ष जातं. आपल्या एका 'खास' मैत्रिणीचा message असतो. पाहताक्षणी आपण खुश होतो. त्या आनंदातच आपण पटकन message उघडतो. message असतो-"Hi,kay kartoys? :-).." त्या शेवटच्या smiley मुळे उगाचच आपल्या मनातही एक smiley उमटतो. "आता आपला अभ्यास रात्री १२.३०-१ पर्यंत चालणार!",आपण मनाशीच म्हणतो,मस्तपैकी refresh होऊन जातो...आता आपली कितीही जागायची 'तयारी' असते... 
                             पण अचानक आकाशात ढग जमून यायला लागतात. विजा कडाडायला लागतात. त्या आवाजाने आपण तंद्रीतून बाहेर येतो. एव्हाना आपण त्या 'खास' मैत्रिणीला परवा सांगणार असलेल्या joke चा विचार करत असतो. ती त्याच्यावर हसून reaction देणारच असते इतक्यात-"कडाड-कड"..."ही साली वीज",अश्या मनातल्या मनात शिव्या घालत आपण उठतो आणि बाहेर येतो. बाल्कनीमध्ये गार वारं सुटलेलं असतं. 
                            मुसळधार पाऊस कोसळत असतो. थोडा वेळ आपण तसेच उभे राहतो आणि मग हळूच हात बाहेर काढून पाण्याचे थेंब हातावर घ्यायचा प्रयत्न करतो. उगाचच आपला innocence जागा होतो. रेलिंग ला रेलून आपण तसेच पावसाकडे बघत राहतो. इतक्यात खिशात phone vibrate होतो. आपण क्षणात innocence मधून adolescence मधे शिफ्ट होतो. Reply केल्यावर पुन्हा innocence. परत adolescence ..पुन्हा पुन्हा तेच तेच होतं. मग शेवटी या shiftingचाही कंटाळा येतो आणि आपण पुन्हा घरात येतो. 
                             पुन्हा पुस्तकात डोकं खुपसणार इतक्यात light जातात. आपण चुपचाप पलंगावर जाऊन पडतो. light गेलेले,अभ्यास नाही करायचाय,गार वारं सुटलंय,backgroundला आवडतं गाणं...एकुणात झोपण्यासाठी perfect वातावरण. पण झोप येतंच नाही. डोळे सताड उघडे,अंधारातही काहीतरी बघायचा प्रयत्न करतायत जणू. आवडतं गाणंही आता साथ देइनासं होतं.मग earphones बाहेर येतात आणि कोसळणाऱ्या पावसाचा आवाज फक्त कानात उरतो. त्या 'खास' मैत्रिणीचा अजूनही reply आलेला नसतो...."गाणं बोअर झालंय,reply येत नाहीये,झोप येत नाहीये,काय करू काही कळत नाहीये"...आता,आपल्यावर कितीही जागायची 'सक्ती' असते... 
                              'विचार'...स्वतःचे! आता तेवढेच आपले आपल्यापाशी असतात. आणि मग नाईलाजाने आपण त्यांनाच कवटाळतो. अगदी जवळून स्पष्ट दिसतात ते मग...दिवसभरात,उजेडात कधी दिसत नाहीत,पण आता अंधारात दिसतात स्पष्ट!...गाण्यांच्या आवाजात विरून जातात,पण पावसाच्या आवाजातही ऐकू येतात स्पष्ट!...एकदम नवीन...आपलेच आपल्यासाठी! 
                              कोणीतरी नवीनच सापडतो आपल्याला आपल्यात,काहीतरी नवीनच जाणवतं आपल्याला आपल्यात,जे आधी कधी नव्हतं...मग संवाद सुरु होतो आपलाच आपल्याशी..प्रश्न पडत जातात आपलेच आपल्याला,उत्तरं मिळवत जातो आपण आपलीच आपल्याशी...वाटतं,इतकं सोपं आहे बोलणं,आपणच आपल्याशी?इतकं कठीण आहे टाळणं,आपणच आपल्याला? आपणच आपल्यावर रागावतो,हसतो,भांडतो,समजावतो..मग एकदाच विश्वास ठेऊन बघावा का आपणच आपल्यावर... आणि जगून बघावं आपल्याला वाटेल तसं...आपल्याला हवं तसं? 
                              खटकन light येतात,आपली समाधी संपते. आताही मगाचचीच स्थिती असते. गाणी ऐकावीशी वाटत नसतात,अभ्यास करायचा नसतो,झोपही येत नसते.पण आतमध्ये एक वेगळीच जाणीव झालेली असते. काहीतरी गोष्ट बाहेर येण्यासाठी खदखदत असते.खरंतर आता जागायची 'तयारी' नसते आणि 'सक्ती' तर त्याहून नसते... 
                              इतक्यात phone vibrate होतो...reply आलेला असतो..पण आपण न पाहताच,नकळत phone बाजूला ठेऊन देतो,कारण... 
                              कारण आपल्याला कळलेलं असतं की आत्ता...आत्ताच आपल्याला खरी जागायची 'गरज' आहे! 

No comments:

Post a Comment