Friday 17 March 2017

17-05-2015

"आता काहीतरी लिहूया...", असं म्हणून मी तासन-तास समोरच्या कोऱ्या पानाकडे बघत बसतो. आणि guess what ते पानंही माझ्याकडे blankly तासन-तास बघत बसतं...काही नाही, फक्त शांतता...वरती ३ च्या स्पीडनी फिरणाऱ्या fanचा आवाज...डाव्या बाजूला वर लाईट आणि उजव्या बाजूला माझीच shadow . मग पुन्हा हातामध्ये पेन खूप वेळ तसंच उघडं आणि मनामध्ये...मनामध्ये कमालीची शांतता...
"This is something new, isn't it ?", i ask myself. म्हणजे इतके दिवस मनात कमालीचा गोंधळ असायचा आणि लिहिताना सगळं शांत व्हायचं . आता आतमध्येच सगळं शांत आहे. ना कुठले प्रश्न, ना कुठली उत्तरं. किंवा असतीलही पण प्रश्न आणि उत्तर यातला फरक आता जाणवेनासा झालाय.
It has been quite a journey. १०वी मध्ये अचानकपणे लिहायला सुरुवात केली. का? कशासाठी? I still don't understand...but the journey was magical. जे काही छोटे १४-१५ लेख लिहिले आणि facebook वर post केले, ते आता स्वतःलाच नवीन वाटतात आणि खरं सांगायचं तर बऱ्याचदा बालीशही...Then a voice inside my head says-"Journey वगैरे म्हणण्या इतकं असं कितीसं लिहिलंयस? १४-१५ छोटे-छोटे लेख, ते पण कुठे publish झालेत असं नाही. आणि direct 'journey '?" ...But why not? I ask myself, why not? तू कशासाठी लिहिलंस? Publish होण्यासाठी? likes मिळवण्यासाठी? Recognition मिळवण्यासाठी?...नाही...पण हे सगळं नको होतं, नको आहे, असंही नाही.
-“मग हवंय काय?”
-“माहित नाही! I don 't know!”
मित्रांनी दिलेल्या या वहीची जेमतेम ६-७ पानं भरलीयेत आणि तू इतक्यात journey वगैरे बोलतोयस. म्हणजे आता लेखन वगैरे संपलं की काय आयुष्यातलं? म्हणजे ही उरलेली शे-दीडशे पान कोरीच राहणार की काय?
पण केवळ पानं कोरी राहू नयेत, म्हणून लिहायचं? म्हणजे मग कोणालातरी आपण सांगायला मोकळे-“एक वही भरून लिहिलंय आत्तापर्यंत..." Anyways ...People will laugh . हजार-हजार पानं लिहिणारे आहेत, त्यांच्यात तू कुठे?...पण हा प्रश्न- “किती लिहिलं, यापेक्षा काय लिहिलं हे महत्वाचं नाही का? आणि तसंही मला कुठे मी लिहिलेलं शाळेच्या पुस्तकात धडा म्हणून छापून यावं असं वाटतं?
‘किती?’ आणि ‘काय?’ यातला फरक आता समजायला हवा तुला...आता ही कोरी पानं भरवायची म्हणून भरवशील, मग नवीन वही, नवीन कोरी पानं, पुन्हा ती भरवण्यासाठी खटपट...शेवटी वह्यांचे गठ्ठे जमत जातील फक्त...आणि याचपासून लांब जाण्याची धडपड चालू आहे ना? ‘फक्त भरवण्यासाठी’, ‘फक्त सांगण्यासाठी की बाबांनो मी लिहिलंय!’. सगळं फक्त दाखवण्यासाठी so that त्यानी स्वतःचा ego झाकला जाईल आणि इतरांचे प्रश्न...
“बाबा रे, १०वील ९७% मिळवले, reputed college ला admission घेतली...बाबा रे १२वीत खूप कष्टानी अभ्यास केला,पुन्हा मार्क्स मिळवले...बाबा रे नोकरी पण केली, family ला support केलं, आदर्श मुलाचा role छान पार पडला...बाबा रे, लग्नही केलं, दोन पोरांना जन्मही दिला, त्यांच्यावर आपल्या धर्माचे, आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटावा असे ४ संस्कारही केले...बाबा रे स्वतःसाठी खूप केलं म्हणून ‘समाजासाठी’सुद्धा थोडं केलं...आणि हे सगळं करून बाबा रे, एक दिवस मेलो!”
सगळं ठरवून...सगळं दाखवण्यासाठी...’हे केलं-ते केलं’...फक्त कुठल्या box वर tick -mark करायची राहून जाऊ नये म्हणून...सगळं काही ती कोरी पानं भरवण्यासाठी. केवळ आपली पानं कोरीच राहतील या भीतीने...
शेजारी जो वह्यांचा गठ्ठा जमत चाललाय, तो एकदा उचल आणि चाळ त्यातली पानं. आणि मांड हिशोब. किती पानं स्वतःहून भरली आणि किती तू भरवायची म्हणून भरवलीस...तू मेल्यावर तुझ्या ‘वह्यांचा’ गठ्ठा वाचायलाही कोणाला वेळ नाही. कुणीतरी तो गठ्ठा उचलेल आणि सरळ रद्दीत विकून येईल...त्यातून त्यांचे ४-५ वडापाव निघतील.
पानं कोरी राहतील ही भीती सोडून दे. कितीही लिहायचं प्रयत्न केलास तरी काही पानं कोरी सुटणारच ना? निदान काही ओळी तरी? Don't worry, let it be. Let your story reveal itself...to you and to the world! आणि तसंही तुझ्या या स्टोरी ची सुरुवात तुला माहितीये आणि end ही. So just relax and enjoy the story...
-“म्हणजे काय करू? लिहिणं बंद करू?”
-“असं कधी म्हणालो मी?”
-“मग वर एवढं सगळं frustration काढलस ते काय म्हणून?”
-“माहित नाही. I don't know...आणि तसंही लिहिणं थांबवणं माझ्या हातात नाही कारण ते सुरु करणं माझ्या हातात नव्हतं. If it has started on its own, it will end on its own! It will just happen.
आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या सहज होऊन जातात, त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागत नाहीत. किंवा त्या गोष्टींसाठी कष्ट करावे लागत असतील तर कुठेतरी काहीतरी गंडतय. For ex. जन्म, भूक, तहान, शू-शी,...लेखन-कविता...प्रेम...तंद्री......मरण!
लिहिण्याची सुरुवात या प्रश्नापासून झाली- “Who am I ?”. आत्ताही तो प्रश्न आहेच. पण का माहित का? आता त्यातल्या प्रत्येक शब्दावरचं वजनच उतरलंय. त्या प्रश्नाचा seriousnessच हरवलाय.
-“Who are you?”, प्रश्न.
-“Hahahaha....!”, उत्तर.
यापेक्षा वेगळं उत्तर मलातरी सध्या सुचत नाही. असो!

No comments:

Post a Comment