Thursday 16 March 2017

29-01-2012

परवाच कोणीतरी फोटो काढला आणि डोक्यात लख्ख flash पडला- शाळा संपतीये .......सगळे चेहरे मग डोळ्यासमोर यायला लागले,सगळ्यांबरोबर केलेली ती मजा आठवायला लागली. हा सहा वर्षांचा काळ किती विचित्र!! जाताना वाटत होत-"किती हळू हळू जातायत दिवस, आणि आता , अचानक सहा वर्षांनंतर खाडकन डोळे उघडतात -"संपली सहा वर्ष? इतक्या लगेच?" 
का कुणास ठाऊक पण..... शाळेत आल्या आल्या दप्तर भिरकावून "पहिली पळती" म्हणत लंगडी खेळायाचीये....रांगेत उभा राहिल्यावर गीता-गिताईचि पिशी हवेत उडवत बालिश गप्पा मारायच्यात.... दलावर मांडी थोपटत कोणालातरी जोरात खुन्नस द्यायचीये....गृहपाठ केला नाही म्हणून मृदुला ताईंचा -"किमपि त्वं लज्जा नास्ति ?" म्हणून ओरडा खायचाय मला....तासाला बाकाखाली लपून डबेच्या डबे फस्त करायचेत मला....तास बंक करून COS मध्ये तासंतास गप्पा मारायच्यात मला....विनाकारण खोडी काढून मस्तपैकी चिडवायचंय मला....खेळल्यानंतर हार पचवून मनसोक्त रडायचंय मला....मित्रांबरोबर गप्पांचा कट्टा रंगवून दिलखुलास हसायचं मला.... 
हे सगळं पुन्हा-पुन्हा आठवून 'सुन्न' व्हायचंय मला.......खरच........आयुष्यात पुन्हा संधी मिळाली तर सगळं , पुन्हा एकदा, पहिल्यापासून सुरु करायचं मला........!!!!

No comments:

Post a Comment