Thursday 16 March 2017

22-01-2012

आता उरले पाच दिवस......फक्त पाच दिवस! प्रत्येकाला ह्याची जाणीव झाली आहे हे नक्की! हां.....आता कोणी मान्य करेल,कोणी नाही.....पण जर डोळ्यात पाहिलंत न समोरच्याच्या तर लगेच कळेल तुम्हाला.... 
"उरलेल्या पाच दिवसात काय करायचे?",हे आता प्रत्येकाने आपापले ठरवले असेलच....त्याबद्दल काय बोलणार पण तरीही.....जे कराल ते मनापासून करा.... 
ज्या शिक्षकांशी तुमचं कधी पटलं नाही, त्यांच्याशी चार चांगले शब्द बोलून बघा.....६ वर्षात जिथे कधी फिरकलाही नाहीत तिथे जरा हिंडून बघा.....जवळच्या मित्रांबरोबरची मैत्री घट्ट कराच पण ज्यांच्याशी कधी फार बोललो नाही असा वाटतं त्यांच्याशी स्वताहून आवर्जून बोला....गप्पा मारा....आठवणींमध्ये रंगा....फोटोची मेमोरी कॅमेरात सेव्ह करताना थोडे क्षण मनाच्या मेमरीतही सेव्ह करून बघा! 
विसरा....राग,भांडणं....सगळा विसरा....किमान ५ दिवसांसाठी तरी? मदत घ्या-मदत करा,ऐका-ऐकून घ्या,बघा-दाखवा.रडा-रडवा,स्वतः हसा-इतरांनाही हसवा.... 
म्हणाल-"५ दिवसात कुठे काय बदलणारे?" मी म्हणीन-"करून तर बघा,मजा घेऊन तर बघाअ गेल्या सहा वर्षात जे अनुभवायला मिळालं नाही ते,ते कदाचित या ५ दिवसातही मिळवलं....कदाचित....???....आता आणखी काय बोलू??? 
आता तुम्ही म्हणाल-"काय रे? फारच भावनिक वगैरे झालास? 
आणि मी म्हणीन-"खरय....काय करू....हां पण हे सगळा बोलताना त्रास होतो,एवढं मात्र खरं....नक्कीच खरं ....!!!

No comments:

Post a Comment