22-01-2015
आवारगी करता हूँ पर मै आवारा नहीं
छोड़ा खुल्ला दिल को मगर खुद को बिगाड़ा नहीं
ऐसे लगे तेरे बिना अब तो गुजारा नहीं
किसीका भी होऊंगा न मै हुआ जो तुम्हारा नहीं
तू ही तो है खयाल मेरा
तू ही तो है करार मेरा
झुटे नशे जहाँ में कभी
तू ही तो है खुमार मेरा
जिन्दा हूँ तुझ पे मर के
भुला सब तुझ को पढ़ के
कैसा है प्यार तेरा
तू ही तो है खयाल मेरा
तू ही तो है करार मेरा
झुटे नशे जहाँ में कभी
तू ही तो है खुमार मेरा
वाह! There can not be more beautiful lines to start with. माझ्यासमोर ही एक अतिशय सुंदर वही उघडलेली आहे. तिचा स्पर्शच इतका जबरदस्त आहे की मी अजून तासन-तास कोऱ्या पानांवर हात फिरवत बसू शकतो. ह्याला इतका मस्त वास आहे की लिहिण्यापेक्षा सारखी नाकाजवळ न्यावीशी वाटते. Front page पासून शेवटपर्यंत या कोऱ्या वहीकडे बघत रहावं फक्त...गेले कित्येक दिवस ही मस्त वही मी जवळ घेऊन बसतोय, छातीशी कवटाळून झोपतोय...त्याला कारणही तसं special आहे.
गेल्या वाढदिवसाला मित्रांनी ही Extra-ordinary वही गिफ्ट म्हणून दिली. तेव्हापासून ती कप्यात तशीच पडून आहे. अधून -मधून जाता-येता तिचा feel घेत होतो एवढंच. काही दिवसांपूर्वी वाटलं-"'बस यार! आता काहीतरी लिहूया त्यात!" पण काय? कारण इतकी सुरेख वही तर त्यात लिहिला जाणारा content ही सुरेखच हवा . मग हा 'सुरेख' content शोधायला लागलो. पण तो साला सापडलाच नाही.
कित्येक दिवस नुसताच विचार करत होतो. ह्याच्यावर लिहू की त्याच्यावर? ही सुरुवात चांगली वाटेल की ती? नाही, नको, तो विषय खूपच बोरिंग वाटतोय. असं काहीतरी नवीन, मस्त विषयावर लिहूया. या Extra-ordinary वहीच्या Extra-ordinary start साठी विषयही तेवढाच Extra-ordinary नको का? खूप वेळ तो Extra ordinary विषय शोधला. पण तो साला सापडलाच नाही.
मग वाटलं,घोडं इथेच कुठेतरी अडतंय. बहुतेक आपली लिहिण्याची इच्छाच नसावी, त्यामुळे हवा-तसा-छानसा विषय सुचत नाहीये. असं force करून लिहिणं जमणारच नाही. छे! जाऊ दे! नंतर पुन्हा कधीतरी लिहूया. आत्ता हा नाद सोडून देऊ. पण मग वहीची सुरुवात कधी करणार? नंतर म्हणजे कधी? ही वही मिळूनच आता ७ महिने झाले. आता अजून वाट पाहत राहिलो तर पुढचा वाढदिवस उगवेल. एखाद-दुसरा जण तरी विचारेलच-"काय रे, काय लिहिलंस त्याच्यात,वाचायला तरी दे!" मग काय बोलणार? नाही-नाही, पुन्हा एकदा प्रयत्न करू. आपल्याला हवा-तसा विषय अगदी जवळच आला असेल .खूप शोधलं साल्याला. पण तो साला सापडलाच नाही.
मग या सुपीक डोक्यातून निघालेली एक idea ..
-"असं करू...आत्ता त्यातल्या-त्यात जो विषय बरा वाटतोय त्यावर आधी एका वेगळ्या कागदावर लिहूया. लिहून झाल्यावर चांगलं वाटलं तर मग ते वहीत उतरवूया. आहे की नाही झकास idea ?"
-पण मग त्या नवीन वहीत first time लिहिण्याची मजा काय?
-"कोणाला कळणारे?'
-"पण मग originality चं काय? मला तर माहित असणार की जे काही लिहीन, ते पहिल्यांदा त्या मस्त वहीत लिहिलं नव्हतं."
च्यायला! आता झाले का वान्दे? आता असं करूया. पेन उचलूया आणि सरळ लिहायला लागूया. काहीतरी सुचेलंच...पण नाही सुचलं तर? किंवा सुरुवातीला सुचून मध्येच सुचणं बंद पडलं तर? पहिलाच लेख अर्धवट राहिला तर? अक्षर वाईट आलं तर? शुद्धलेखनाच्या चुका झाल्या तर? खाडा-खोड झाली तर? Imagine. नवीन,मस्त,सुंदर,extra-ordinary वही आणि तिच्या पहिल्याच पानावर सर्रास खाडा -खोड ...अरे कुठे फेडशील ही पापं?...नरकात तरी जागा मिळेल का?
आणि मग स्वतःवरच खूप हसू आलं. खूप-खूप-खूप हसू आलं. आणि एकदा स्वतःवर हसू आलं की मग दोन गोष्टी होतात. एक म्हणजे तुम्ही बिनदिक्कतपणे स्वतःला मूर्ख ठरवून मोकळे होता आणि दुसरं म्हणजे आता तुम्हाला कोणीही मूर्ख म्हणालं तरी तुम्हाला त्याचं वाईट न वाटता आणखी हसू येतं. बोनस हसू!
मग शेवटी ठरलं- लिहूचया! होणाऱ्या चुकांना किती घाबरायचं? शेवट कसा होईल या भीतीनी सुरुवात किती दिवस टाळायची? आता ठरलं. जसं होईल तसं लिहूया. टुकार तर-टुकार! हां...पण एवढी सगळी philosophy मारली तरी साला 'तो' काही सापडलाच नाही हां!
वाटलं,इतके दिवस इतरांवर फक्त टीका केली. हे कसं भंगार, हे कसं टुकार एवढंच लिहिलं. आता जरा 'positive ' लिहू. जरा स्तुती करू सगळ्यांची. तर धड ते सुद्धा जमेना. मग शेवटी patent विषय- 'आयुष्य'...पुन्हा स्वतःवर हसू...काय लिहिणारेस ? आयुष्याचा अर्थ? meaning of life? hahaha ,nice ...इतकी पुस्तकं वाचलीस, गाणी ऐकलीस, लेख लिहिलेस...काही सापडलं का?
-"घंटा!"
कशाला उगाच थातूर-मातुर,चार-पाच जड वाक्यं टाकायची? त्यांनी थोडीच कधी meaning कळालंय ? Life has no meaning . Beyond meanings,there are feelings.But life is not even feelings.It doesn't have to mean anything. Because it is just a flow. Yes, may be,life is just a continuous flow...like a river? उगमापासून-समुद्रापर्यंत पाणी हे पाणीच असतं. आपण त्याला ओढा,नदी,झरा,समुद्र अशी नावं पाडली, किनाऱ्यावरून बघताना. पण आतमध्ये फक्त पाणीच आहे. Continuous,uniform...किनाऱ्यावरून पाण्याची खोली मोजू नकोस. आयुष्य न जगता त्याचा अर्थ शोधू नकोस.किनारा सोड आणि पाण्यात उतर . हे अर्थ-बिर्थ सगळं बाहेरच्यांसाठी, आतल्यांना त्याची फिकीरच नाही.
मग काय? पेन घेतलं,वहीचं पहिलं पान उघडलं...आणि किनारा सोडला...एक मस्त गाणं चालू होतं...त्याच्याच शब्दांनी सुरुवात केली.त्यात ते romantic निघालं (romance तो अपने अंदर कूट-कूट के भरा है!).
extra-ordinary विषय मिळाला का? माहित नाही. extra -ordinary वहीची सुरुवात extra -ordinary झाली का? माहित नाही. आणि खरं सांगायचं तर आता त्याची फिकीर नाही.
-"कारण?"
-"आतल्यांना त्याची फिकीरच नाही!"

No comments:
Post a Comment