Friday 17 March 2017

15-07-2015  

कॉलेजचा पहिलाच दिवस...late admission...त्यामुळे मनात थोडीशी भीती...त्यातच उशीर झालेला. ५-१० मिनिटं उशिराच वर्गात पोहोचलो. ७:१० चं lecture होतं. वर्ग बऱ्यापैकी भरला होतं. एक कोणीतरी सर शिकवत होता. ('तो' सर म्हणण्याचं कारण एवढंच की तो तरुण वाटत होता. त्यामुळे एकेरीवर उतरलो असलो तरी हेतू अपमान करण्याचा नसून कौतुक करण्याचाच आहे.) तर तो एक कोणीतरी सर शिकवत होता. मी चूप-चाप शेवटच्या बाकावर जाऊन बसलो आणि काय चाललंय ते ऐकायचा प्रयत्न करायला लागलो.५-१० मिनिटं झाली असतील, अचानक मला काहीतरी click झालं. मी शेजारच्या बाकावरच्या मुलीला हळूच विचारलं- 
                           "Is this class for SYBA?" 
ती म्हणाली- 
                           "No! This is FYBA." 
-                         "Oh!", मी. 
                    तिच्या आजूबाजूच्या चार मुली माझ्याकडे विचित्र नजरेनी बघत हसायला लागल्या. (अशावेळी 'त्या' हसण्याचं काहीच वाटत नाही.) मी उठलो आणि बाहेर जायला लागलो. तो सर बावचळला. त्याला कळेना, हा मुलगा अचानक उठून जायला का लागला. त्यानी मला थांबवलं, विचारलं- 
                            "What happened?" 
मी-                       "Sir, I am in wrong class!" 
                    त्यानी थोड्यावेळ माझ्याकडे विस्फारून पाहिलं मग मोठ्ठा श्वास घेऊन म्हणाला - 
                            " Oh! Happy Realisation!" 
                    सगळा वर्ग हसायला लागला. तो सर हसायला लागला आणि मीही हसायला लागलो आणि 'माझा' वर्ग शोधायला बाहेर पडलो. १५-२० मिनिटं तो वर्ग सापडण्यातच गेली. दरम्यान मी खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर, ह्या corridor मधून त्या corridor मध्ये अशा २-४ चकरा मारल्या. 
                    "Is this class for SYBA?", हा प्रश्न विचारून सगळ्या वर्गात सकाळी-सकाळी थोडा-थोडा हशा पिकवून आलो. मी corridor मधून ये-जा करताना त्या वर्गामधली पोरं माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेनी पाहायला लागली. काहींच्या चेहऱ्यावर तर मला- "सापडला की नाही?" , या अर्थाचं काळजीयुक्त हसू दिसलं. शेवटी तो वर्ग सापडला आणि माझा college सुरु झालं. 
                     नंतर असाच एका वर्गात बसलो होतो. मला off होता. सगळी पोरं आपापल्यात गुंतली होती आणि मी नवीन smartphone मध्ये...अचानक एक madam आत घुसल्या. (आता आदरार्थी उच्चार केला म्हणजे त्या तरुण नव्हत्या असा अर्थ सुज्ञ वाचकाने मुळीच घेऊ नये. यावेळी मी 'वय' सोडून 'सुंदरता' हा criterion वापरला. हे अशी partiality का, हे पुढे कळेलच.) 
                      मी मागच्या अनुभवाने शहाणा झालेला. मी लगेच एका मुलीला विचारलं- 
                             "Which class is this?" 
ती-                        "English Literature" 
                       बापरे! मी तडक बाहेर निघालो. माझा विषय नव्हता. पुन्हा त्या madam बावचळल्या. पुन्हा त्यांनी विचारलं काय झालं आणि मी पुन्हा तीच जुनी स्टोरी repeat केली की मी new admission  आहे, मला अजून काही माहित नाही blah blah blah... 
                        त्या madam ला काय वाटलं काय माहीत, पण त्या म्हणाल्या- 
                               "Now,you will have punishment. You will sit for this lecture!" 
                        माझा चेहरा पडला आणि सगळ्या पोरांना आसुरी आनंद झाला - "कर सहन आता तू पण...!" type चा. मी उगाचच हसलो आणि मागे जाऊन बसलो. पुढचा बराच वेळ मी आळस देत, जांभया देत त्यांना सांगायचा प्रयत्न करत होतो की, तुम्ही मला खूप बोअर करताय, मला जाऊ द्या. पण madam बधल्या नाहीत. त्यांनी चक्क दुर्लक्ष केलं. Meanwhile, मी English Literature हा विषय घेतला नाही हे खूप चांगलं केलं, हे एक "Happy Realisation" मला झालं. 
                        Lecture संपलं. त्या madam नी मुद्दामहूनच मला सगळ्यांसमोर विचारलं- 
                               "So, how did you find this class?" 
                        मी तर तयारीतच होतो. मी म्हणालो- 
                               "Well mam, I must say, you have punished me very hard!" 
                        आता madam चा चेहरा पडला आणि सगळ्या वर्गाला पुन्हा आसुरी आनंद झाला - "तूच रे भावा तूच..." type चा... 
                        पहिला दिवस एकुणात वेगळाच गेला. सगळं नवीन असल्यामुळे थोडी उत्सुकता, थोडी भीती यांचं mixture मनात आहे. त्यातून पुढे कदाचित असेच काही किस्से घडतीलही. 
                        शहर सोडायचं म्हणजे काहीशी सरळ कल्पना माझ्या डोक्यात होती. कपडे घ्यायचे, काही महत्वाचं सामान घ्यायचं, bag उचलायची आणि निघायचं...फार काही लांब जात नसल्यामुळे काही राहिलंच तर ते आणायला परत यायचं, एवढी साधी कल्पना. पण ते इतकं सरळ नाहीये हे हळू-हळू लक्षात आलं. कपडे, सामान यासोबत काही स्वप्नंही घेऊन निघालोय. आणि त्याबरोबर काही अर्धवट राहिलेले plans, कधीतरी बेसावध क्षणी दिलेली promises, काही अपूर्ण राहिलेल्या गप्पा...हे सगळं मागे सोडून चाललोय. 
                         तसा काही फार लांब चाललो नाहीये, पण तरी लग्न करून सासरी जाणाऱ्या मुलीच्या feelings चा अंदाज येतोय. म्हणजे जिथे चाललोय ते आपलंच आहे, आपल्यासाठीच आहे आणि खूप चांगलं आहे, पण जिथून निघतोय, ते सोडणं जिवावर येतंच ना? 
                         कोणाला काही आवर्जून सांगितलं नव्हतं कारण मनात हा विचार होतं की - 'असा कितीसा फरक पडणार आहे?'...पण गेल्या २-३ दिवसात लोक असे काही वागले की स्वतःलाच स्वतःची लाज वाटायला लागली. एकाने मी न जाणं किती महत्वाचं आहे हे पटवून दिलं. एकीने- 'कोणाला किती फरक पडतो, हे तू ठरवायचं नाहीस' , अशी शिव्या घालून सक्त ताकीद दिली. एकीने शेवटच्या क्षणापर्यंत रडवलं आणि मग हसून पाठवलं. आणि एकाने मनापासून लिहिलेला emotional असा message पाठवला. 
                         खरंतर या सगळ्याची सवय नाहीये. किंवा हे एवढं सगळं मिळेल की नाही अशी भीती मनात होती, त्यामुळे सगळंच टाळत होतो...पण मिळालं...आणि इतकं मिळालं की आता त्यात पार बुडून गेलोय. आणि आता त्याच्यातच बुडून रहावसं वाटतंय. इतके लाड करून घ्यायला कोणाला आवडणार नाही? 
                         कधी-कधी वाटतं, ह्या सगळ्याला काय अर्थय? सगळं किती क्षणिक, खोटं-खोटं आहे? पण मन मानायला तयार होत नाही. खऱ्यामध्ये जसं थोडंसं खोटं असतंच, तसं मग खोट्यामध्ये पण खरं असेलच ना? आणि जाऊ दे ना...एक गोष्ट शिकलोय ती म्हणजे जेंव्हा मिळतं,तेंव्हा गप्पं बसावं, आणि घेत रहावं...because it is god's gift!!! 
                         अजून बऱ्याच जणांना भेटायचंय, बऱ्याच जणांशी बोलायचंय. पुन्हा काहीजण शिव्या घालतील, पुढे होऊन मिठ्या मारतील, काहींशी चर्चा झडतील, काहींशी गप्पा रंगतील. पाय थोडासा इकडेच अडकून राहील. 
                        पण राहू दे! आकाशात उडायला झेपावताना जमिनीची ओढ लागून राहते, याहून चांगलं काय? ती ओढ अशीच रहावी आणि हे प्रेम असंच मिळत रहावं, ही प्रार्थना! 
                        आता हे संपवू कसं कळत नाही. खूपच emotional झालं. एखादा joke लिहिला असता पण तेही फार typical वाटेल. असो! पण typical वागण्यामध्येही कधी-कधी किती मजा असते, हे आता कळायला लागलंय...आणखी काय सांगू?... 
                     

No comments:

Post a Comment